STORYMIRROR

Rama Khatavkar

Abstract

3  

Rama Khatavkar

Abstract

संवादाची सायंकाळ

संवादाची सायंकाळ

1 min
47

विश्वास बसत नाही, 

पण

खरंच एक काळ असा होता!

कुठलाही विषय आपल्या गप्पांना

वर्ज्य नव्हता

मग हळूहळू

अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं

एकामागून एक किरणं आवरत जावं,

तसा एक एक विषय

बोलण्यामधून बाद होत गेला

संवादाची सायंकाळ आक्रसत गेली

रात्रीला अगदी कमी काळ उरलाय...

असं वाटतंय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract