संवाद
संवाद
त़ु्झ्या-माझ्यामध्ये आता
पहिल्यासारखा संवाद होत नाही
मीच एकटा बडबडतोय
तू मात्र काहीच बोलत नाही
ऑफिसला जाताना तू
दारापर्यंत सोडायला यायची
दुपारच्यावेळी आठवणीने फोन करायची
संध्याकाळी दारात उभी राहून वाट माझी बघायची
आता कुठं गेला तुझा तो लडिवाळा काही कळत नाही
तुझ्या-माझ्यामध्ये आता
पहिल्यासारखा संवाद होत नाही
घर असूनही घरात कुठे
घरपण दिसत नाही
बोलायचं म्हटलं तर
बोल फुटत नाही
जरावेळ तुझी मला सोबत हवी असते
पण तू
खूप कामे पडलीत म्हणून टाळत असते
संगतीने फिरायला जायचं म्हटलं तरी
तिथेही तू उगाचंच भाव खात असते
एकटाच बसतो ओसरीवर मी
तरी तू लक्ष देत नाही
तुझ्या-माझ्यामध्ये आता
पहिल्यासारखा संवाद होत नाही
दिवसभर तू त्या मोबाईलमध्ये व्यस्त असते
डोळे लाल लाल होतात तरी तू डोळे फाडून बघते
व्हाटसप-एफबीवर तुझे
नेहमीच चॅटिंग सुरू असते
बोटं दुखायला लागतात
तरी तू मोबाईल सोडत नाही
तुझ्या-माझ्यामध्ये आता
पहिल्यासारखा संवाद होत नाही
तुझ्या-माझ्यामध्ये
संवाद होऊ नये म्हणून का
मोबाईल घेतला आहे
या मोबाईलमुळेच आता
बोल अबोल झाले आहे
सुख-दु:खाच्या गप्पा करण्यात
किती आनंद असतो
एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलण्यात
काही कमीपणा नसतो
दोघांची काळजी घेण्यात किती सुख आहे
त्या सुखातच खरं प्रेम आहे
पण तुला कितीही समजावले तरी सवय तुझी जात नाही
तुझ्या-माझ्यामध्ये आता
पहिल्यासारखा संवाद होत नाही...
