STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Others

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

2 mins
288

हाती  घेऊन खराटा

झाडतसे  पुर्ण  गाव |

संत आगळा वेगळा

आहे डेबुजी हो नाव ||१||


वस्त्र  फाटके  नेसून 

हाती  गाडगे  घेऊन |

देई  समाज  शिक्षण 

अर्धी भाकर खाऊन ||२||


करी  कीर्तन  भजन

सर्व  गावात  फिरुन |

मंत्र  स्वच्छतेचे  देत

कार्य  प्रत्यक्ष  करुन ||३


स्वतः शिकले नव्हते

पण होते  छान तत्व |

किर्तनात   सांगतसे

शिक्षणाचे हो महत्व ||४||


अंधश्रद्धा तोडण्यास 

सांगे धरुनिया ध्यास |

देव   दगडात   नाही

असे  माणसात वास ||५||


दीन   दुबळे   अनाथ

आणि अपंगाची सेवा |

केली  गाडगे बाबांनी

होता  मुल्यवान  ठेवा ||६||


जनतास   सांगतसे 

गावोगावी गेल्यावर |

तुम्ही माझे देवालय

बांधू नका मेल्यावर ||७||


नाही होणार आजारी 

स्वच्छतेचा काम करा |

ज्ञान   गाडगे  बाबाचे

तुम्ही  जीवनात  धरा ||८||


करा गाडगेबाबांच्या

विचारांचे    संवर्धन |

सुखी होईल जीवन

सांगतसे    गोवर्धन ||


Rate this content
Log in