समुद्र
समुद्र
1 min
362
समुद्र शांत
कधी खवळलेला
फेसाळलेला....
लाटा त्या छान
सुंदर तो किनारा
बेधुंद वारा.....
मनास वाटे
मारा फेरफटका
कधी एकटा....
आकाश खुले
समुद्र गर्द निळा
लावितो लळा...
शंख शिंपले
मिळे समुद्रातून
मोती नूतन...
