स्मृती
स्मृती
शब्द खुळे की या स्मृती ?
पण मन गुंतले स्मृतींच्या शब्दांत..
वेडेपिसे बेभान होऊनी,
अडकलेले त्या मोरपीसात..
जणू रंग उडाले सारे काही,
तरी अजुनी का हे मोरपीस सप्तरंगी?
का साथ अशी ही सुटली?
तू येशील पुन्हा, मन धावा करीतसे..
आहेस तू नेहमी सोबती हा विश्वास आहे..
सारा छळ हा मोरपीस करीतसे..
धूसर आठवणी स्पष्ट सामोरी..
एकटीच मी या साऱ्या विश्वात,
वेळेचा ताळा चुकीतसे..
विलास सारा होतसे..
स्वप्ने गेली विरुनी,
समुद्रकिनारी जणू रेती..
शून्यास सारे मिळुनी जाती..
म्हणुनी रवी का लपंडाव खेळीती?
समुद्रकिनारी नवीन पदचिन्हास कळी उमलिती,
स्मृती भूतकाळातील पदचिन्हांची अंकुर फुलविती..
येण्याची तुझी चाहूल आशा देती..
सारा तो मनाचा खेळ,
ओसारता सारा भ्रम,
तोच करावा मनासि फितूर,
पुन्हा एकदा..
श्वास सोडिना जीवास,
सार सारे अक्षय..