पैलतीर
पैलतीर
1 min
439
एका ऐलतीलावरून पैलतीरी कसं जाता येईल,
हा विचार करता करता एक तीर येतो,
मला माहिती नसतं हा तोच का दुरून दिसलेला?
संभ्रमात मीच चुकली असावी,
थोडं पुढे जाऊन बघू, ही स्वस्थ न बसू देणारी भावना
पुढे ढकलत राहते,
मी पाहिलेला पैलतीर मागेच थांबून मी येण्याची वाट बघत बसतो,
एव्हाना मी निराशेने थकून वापस निघते,
हवा असलेला पैलतीर आता ऐलतीर बनतो,
फक्त सकाळचा enthusiastic रवी आता,
थोडा थकलेला का असेना,
पण माझ्यासोबत हसत उद्याचा तीर गाठायची प्लॅंनिंग करत असतो..
