खिडकी
खिडकी
1 min
382
काही खास कारण नसताना,
कधीही कितीही वाजेपर्यंत इथे बसून राहिलं तरी कंटाळा येत नाही
.
.
कधी खूप पाऊस,
कधी खूप ऊन..
.
.
पाऊस असला तरी, खिडकी त्यातले सगळे थेंब नाही हिसकावून घेत,
तिच्या तापलेल्या मनाला ओलावा मिळेल एवढा पाण्याचा सडाका घेऊन ती थांबते,
बाहेर पावसाचं थैमान चालू असलं तरीही..
उन्हाळ्यात बाहेर कडक ऊन आणि इथे सावली,
वाऱ्याचा थंड झोत हळूच कानाशी वाजवून जाते ..
.
.
आई लहानपणापासून सांगत आली,
'प्रत्येक गोष्टीतून अपेक्षा करणं सोडून दे आणि विश्वास ठेवायला शिक स्वतः वर..!
दररोजच जगणं सोपं होईल'..
तेव्हा लक्ष नाही दिलं या गोष्टीकडे मी कदाचित,
म्हणून ही खिडकी या वाक्याची आठवण आजकाल दररोज करून देते वाटतं..
