STORYMIRROR

SUNIL GHANEKAR

Others

3  

SUNIL GHANEKAR

Others

श्री क्षेत्र गणपतीपुळे

श्री क्षेत्र गणपतीपुळे

1 min
457

अगाध महिमा या जगात

पावन कोकण तुझ्यामुळे ।

भक्तवत्सल गणनायक 

श्री क्षेत्र हे गणपतीपुळे ।।१।।


स्वयंभू दिव्य मंगलमूर्ती

नांदते डोंगरी हृदयात ।

श्री गणेश तेज प्रकाशित

अरबी समुद्री सान्निध्यात ।।२।।


नक्षीदार बाप्पांचे मंदिर

गर्द हिरवी ही वनराई ।

पंच त्रिपुरं दोन्ही बाजूला

त्रिपुर पौर्णिमा रोषणाई ।।३।।


हात जोडून मूषकराज

मंदिर प्रवेशद्वारावर ।

मागणं सांगता कानापाशी

बाप्पांजवळ सांगे सत्वर ।।४।।


हत्ती उभे द्वारी स्वागताला

भिंतीवरती स्तोत्रे-आरती ।

माय-पित्याची शोभे प्रतिमा

द्वारावरती शिव पार्वती ।।५।।


शेंदूर चर्चित छान मूर्ती

संगमरवरी गाभाऱ्यात ।

आराध्य दैवत विघ्नहर्ता

परमसुख प्रदक्षिणेत ।।६।।


अंगारकी, संकष्टी, माघी

चतुर्थीला येथे भक्त येती।

भक्तीचा हा सुखद सोहळा

मनोकामना या पूर्ण होती ।।७।।


Rate this content
Log in