पावसाचा मृदगंध
पावसाचा मृदगंध
1 min
229
नभी अंधार दाटला
भासे भयानक निशा ।
नृत्य पाहून विजेचे
थरारल्या दाही दिशा।
सरसर खाली आल्या
रेशमाच्या जलधारा।
अंग भिजूनीया गेले
न्हाऊन गेली धरा।
खळाळून हसे पाणी
निर्झराच्या कोंदणात।
नृत्य करीती मयुर
इंद्रधनू कमानीत।
पशु पक्षी आनंदले।
वाहे वारा आनंदाचा।
मनमयुरा फुलवी
मृदगंध पावसाचा।
