प्रलयाचे तांडव
प्रलयाचे तांडव
1 min
301
न्याय मागावा कुठे? । उध्वस्त झाले घरटे ।
प्रलयाचे तांडव करशी, का मेघराजा? ।
शोक सागरी बुडाला, हा बळीराजा ।
तीर गाठावा कुठे ?। उध्वस्त झाले घरटे ।।१।।
असा कसा खेळ चालला, दैवगतीचा ।
अर्ध्यावर डाव मोडला, सुखी संसाराचा ।
वाहून गेले खोपटे । उध्वस्त झाले घरटे ।।२।।
लाभला चिमण पाखरा, मायेचा ऊबारा ।
ममतेनं मुखी भरवला, चिमणा चारा ।
कसे जगावे एकटे? । उध्वस्त झाले घरटे ।।३।।
न्याय मागावा कुठे? । उध्वस्त झाले घरटे ।
