STORYMIRROR

SUNIL GHANEKAR

Others

3  

SUNIL GHANEKAR

Others

आई विश्वस्वरूपिणी

आई विश्वस्वरूपिणी

1 min
366

ईश्वराची मांगल्य मूर्ती

ऊभी संसार मंदिरी ।

पंचप्राण ओवाळून पूजिन

रूप आईचे अंतरी ।।१।।


नऊ मास ते मातृत्वाचे

सोसून नाना यातना ।

पांग कसे फेडू मी आई?

ऋण फिटता फिटेना ।।२।।


जन्म देऊनी विश्व दाविले

नयनांच्या तेवती ज्योती ।

संस्काराची शिकवण देण्या

होशी तू शुभंकरोती ।।३।।


गृहलक्ष्मी तू घराची

घराला येई घरपण ।

अन्नपूर्णा होऊन देशी

सुख आणि समाधान ।।४।।


ममतेची ही वाहे सरीता

करुणेचा अखंड झरा ।

पंखात तुझ्या शिरताना

लाभे सौख्याचा ऊबारा ।।५।।


तेजोमय जीवनशक्ती

झिजशी तू चंदनापरी ।

धरून पाळण्याची दोरी

अखंड विश्व उद्घारी ।।६।।


जन्म घेऊन तुझ्या पोटी

झालो मी भाग्यवान ।

तुझ्या चरणस्पर्शात आई

पवित्र तीर्थस्थान ।।७।।


स्वरूप तुझे जेव्हा कळते

ऐकता गोड अंगाई ।

वात्सल्याची तूच देवता

विश्वात कुठेही नाही ।।८।।


Rate this content
Log in