श्रद्धा अंधश्रद्धा
श्रद्धा अंधश्रद्धा
श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये
गफलत करू नये,
श्रद्धेच्या नावाखाली हळूहळू
अंधश्रद्धेकडे वळू नये
श्रद्धा ही आदर, विश्वास आणि
भक्तिभावाने उदयास येते,
तर अंधश्रद्धा ही स्वार्थ, भीती
आणि लालसेपोटी निर्माण होते
लोक चमत्काराची आस बाळगून
पैशाच्या पावसासाठी प्रयत्न करतात,
आणि मग विज्ञानाच्या या युगातही
कित्येक निष्पाप या अंधश्रद्धेचे बळी ठरतात
पुत्र प्राप्तीच्या इच्छेपायी महिलांना
भोंदूबाबांकडे नेले जाते,
रंगेल भोंदूबाबांकडून मग
असहाय्य अबलांचे शीलहरण केले जाते
श्रद्धेने रूग्णाच्या जीवनदानासाठी
प्रार्थना जरूर करावी,
परंतु इस्पितळात नेण्याऐवजी
ढोंगी बाबांची वाट नाही धरावी
परीक्षेत पास होण्याकरिता अभ्यास करावा
चमत्काराची वाट पाहू नये,
यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत
श्रद्धा बाळगावी, अंधश्रद्धेत न्हाऊ नये...
