शोधु कुठे तुला मी आई
शोधु कुठे तुला मी आई
शोधू कुठे तुला मी आई
सांग ना मला
पाहू कुठे तुला मी आई
सांग ना मला......
तुझ्याविना हे जगणे नाही
नाही कधी मी राहीलो
हरवलीस तू कुठे ग आई
पोरका मी झालो
अंगाई कोण गाईल आता
सांगना मला......
सोडून का तू गेलीस गं
विसरून सुख सारे माझे
होकार कोणास देवू मी आई
आठवण तुझी येते गं
बोलू कुणाशी आता आई मी
सांगना मला.....
दिसणार नाहीस आता कधी
परतून तू येशील का
एकटाच रडतो मी आई
प्रेम तुझे असेल का
भेटू कुठे तुला मी आई
सांग ना मला....
आई गेली प्रेम ही गेले
पदर मायेचा हरवला कसा
बोलू कुणाला आई मी आता
आधार जगण्याचा गेला कसा
मायेची सावली घेवू कुठे मी आई
सांग ना मला
शोधू कुठे तुला मी आई
सांगना मला
पाहू कुठे तुला मी आई
सांग ना मला...
