STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

शिंतोडे

शिंतोडे

1 min
743


आज काल इथल्या भिंतींवर उडतात फक्त शिंतोडे

आदळतात इथे रोज शब्दांचे तडाखे


जातात रोज नव्याने भिंतींना तडे

आणि लटकतात इथे फक्त जख्मी मने


उमटतात ईथे फक्त ओरखडे

आणि वावरतात ईथे फक्त, खुनशी मने


शिंतोडे गटा-गटातले, एक-मेकातले

धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, पक्षांच्या


ज्याचे त्याचे आपले नायक

ज्याचा त्याचा आपला झेंडा


प्रतिमा सगळ्यां कडे

मिरवतो, लटकवतो


त्यांच्या सारख दिसायच

घोषणा देत फिरायच


बस एवढच जमत

त्यातच छाती फुगते


खरा आदर्श घेतो कोण ?

त्यांची शिकवण घेतो कोण ?


ते माहानच होते..पण

स्व:कष्टाने, मेहनतीने


संघर्ष केला, मात केली

ज्ञान मिळवले, सिद्ध केले


ते ही...

कुठल्याही टेकू विना


त्यांच्या इतक कणभरच

जरी कमावल आपण


तरी खुप कमावल

खुप सुधारलो आपण


मग ना गरज टेकूची

ना घोषणांची ना झेंड्याची


ना द्वेष उरे ना तेढ

ना शिंतोडे ना तडाखे


उरतील फक्त प्रसन्न मने

भिंतींवर फक्त मैत्री सुमने.


साहित्याला गुण द्या
लॉग इन