सौंदर्याचा चोरं !
सौंदर्याचा चोरं !
1 min
11.9K
नाकात प्रितीची नथ तुझ्या
कपाळी प्रेमाची चंद्रकोर,
नयनांत धगधगती मशाल तुझ्या
भुवया तुझ्या इंद्रधनुष्याची कोर
ओठ तुझे लाल गुलाबी
प्रेमाची लालीमा तुझ्या गालावर
सोनेरी चमक तुझ्या केसांची
घालतेय माझ्या नयनांना भुरळ,
देखणं तुझं हे रूप माझ्या
गेलय काळजाच्या आरपारं
केली नसून चोरी मी कधी
पण झालोय तुझ्या सौंदर्याचा चोरं...