सावरून घे
सावरून घे
1 min
34
तुझ्या सोबतीत विनले घरटे
घट्ट धरून ठेवू नाती
बाधंला भावनांना बांध
जपू नात्यांच्या धगधगत्या वाती
माडंला कुठे विचारांचा पसारा
सावरून घे तू शांतपणे
तोडणे असे खूपच सोपे
सोडू नकोस कधी तू जोडणे
एकटेपणा कधी वाटला
विरघळून घे जुन्या नात्यात
बोल चार गोष्टी मनातल्या
गारवा पसरेल तुझ्या वागण्यात