STORYMIRROR

Amol Shinde

Others

3  

Amol Shinde

Others

सारे विरोधात गेले

सारे विरोधात गेले

1 min
268

तुटलेलं काळीज जोडणारे सारे विरोधात गेले

गुदगुल्या करून हसवणारे सारे विरोधात गेले


निवडणूक लढवली नाही मी राजकारणाची 

रोजचे जवळून जाणारे सारे विरोधात गेले


काळजाची जखम ती ओली झाली अन

जीव ओवाळून टाकणारे सारे विरोधात गेले


देवा का विरोध तुझा माझ्या भक्तीला झाला

सोबत पूजा करणारे सारे विरोधात गेले


काय गुन्हा झाला माझा खरे बोललो मी

मायेचा हात फिरवणारे सारे विरोधात गेले


पहावं म्हणलं आज सत्य वागून जरासे

जहालं खोटं पचवणारे सारे विरोधात गेले


वागले का माझ्याशी असे कळले नाही कधी

आज का मला घडवणारे सारे विरोधात गेले


Rate this content
Log in