सांगा कसं जगायचं
सांगा कसं जगायचं
1 min
213
नाही कामधंदा काही
सांगा कसं जगायचं
जाता जाईना कोरोना
कसं पोट भरायचं....? १!!
रोजगार नाही काही
होते जिवाची गं लाही
फुलं विकाया बसले
कोणी गि-हाईक नाही....!!२!!
दीड वर्ष झाले तरी
शाळा काही उघडेना
ऑनलाईन शिक्षण
मोबाईल काही मिळेना....!!३!!
धनी कोरोनाचा बळी
संसार मोडून पडला
स्वतः लिही वाच पोरी
नशिबच गं अडला.....!!४!!
आले लाख संकटे जरी
नाही मोडून पडायचं
कष्टाच्या मार्गाने कमवून
स्वतः हळूहळू घडायचं....!!५!!
स्वाभिमानाने जगायचं
नाही हिंमत हारायच
आलो जरी उघड्यावर
स्वकष्टानेच घडायचं......!!६!!
