STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

सागरी किनारा

सागरी किनारा

1 min
85

 वाटे सदा ओळखीचा

जणू साथी जीवनाचा

जाता क्षणैक जवळी

मिळे आनंद मनाचा


किती भव्य रुप तुझे

वाटे पहात बसावे

 मनी उठती तरंग

मन हलके करावे.


पहा आली भेटण्यास

लाट किती उफाळून

 भेटताच किनाऱ्याला

  विरतेच ती लाजून


 वाटे पहात रहावे

तुझा चालणारा खेळ

मन होई प्रफुल्लित

 मजेतच जाई वेळ


धन्य त्या ईश्वराचे

धरा पहा रमणीय

कुठे नदी , दरी, गिरी

किमयाच शोभनीय


साहित्याला गुण द्या
लॉग इन