ऋतू बदलला
ऋतू बदलला
दिवस बदलतात
दिनमान बदलतात
हवा बदलते
हवामान बदलतात
ऋतू बदलतो
पानझडी होते
नवी पालवी येते
सावली देते
कवेत घेते
निसर्ग खेळतो
गारवा देतो
हिरवा हिरवा होवून
पारणे डोळ्याचे फेडतो
ऋतू बदलवत असतो
डोंगरदऱ्याची वाट
सह्याद्रीचा घाट
फुलांचा गंध
मातीचा सुगंध
पाखरांची किलबिलाट
पाना फुलांच लाजण
झरे झिरव्यांच हसण
कोकीळेचा सुर बदलतो
कळीला शिळ घालतो
वेलींना झुलवतो
पारंब्याही झुलतात
झोका घेतात
उंच जातात
सप्तरंग खाली येतात
किरणे सोनारे होतात
फुले बहरतात
सडा घालतात
लतिका लाजते
स्पर्शून खुलते
वसुंधरा वेडावते
खळी गालावर पडते
दुर कुठूनतरी
पाखरे येतात
हितगुज करतात
नाते प्रेमाचे बांधून
सैरभैर होतात
माणसे रंग बदलतात
तसा ऋतूही बदलतो
