रस्ता
रस्ता
1 min
335
वाटसरूंना वाट दाखवणारा रस्ता,
काय झाले असते जर हाच नसता ?
वाहन चालवताना खाव्या लागल्या असत्या खस्ता,
जर व्यवस्थित नसता रस्ता,
रस्त्या विना वाट अपूर्ण,
गाड्या पसरल्या संपूर्ण.
वाट दाखविणारे हे रस्ते,
स्थिती दाखवणारे हे रस्ते.
कच्चे रस्ते दाखवितात गावाची,
स्थिती तेथली अविकासाची.
भोगद्यातले रस्ते,
फक्त डोंगर भागातच वस्ते.
आधुनिक रस्ते शहरातील,
मग ते सिमेंट किंवा डांबरी असतील.
जीवनातला रस्ता असाच असतो,
जो स्वतःस मनासारखी वाट दाखवितो.
