माझी शाळा
माझी शाळा
1 min
371
अशी होती माझी शाळा,
लावी ती सगळ्यांना लळा,
शाळेच्या शेजारी एक मळा,
मुले रानमेवा करती गोळा.
आम्हास ज्ञान देणारा तो फळा,
होता स्वतःच काळा.
झरा वाहे खळा-खळा,
त्याच्या शेजारी माझी शाळा.
शाळा सुटली सगळे पळा,
अशी होती माझी शाळा.
