माझा गाव
माझा गाव
1 min
466
वाफोली त्याचे नाव,
माझे सुंदर अशे गाव.
देवाची गावावर सावली,
ग्रामदैवत श्रीदेवी माऊली.
बारा वाड्यांचा हा गाव,
पंचक्रोशीत त्याचे नाव.
माझे घर मधलीवाडीत,
आमची वाडी गच्च झाडीत.
ग्राम दैवावर सर्वांची श्रद्धा,
बाल तरुण किंवा वृद्ध.
मुख्य काम शेती-बागायती,
मुले खेळती-आनंदाने गाती.
आमची माणसे साधी,
गावाशेजारी एक नदी.
नाव तिचे तेरेखोल,
काय सांगू तिच्यात पाण्याचे मोल ?
एक स्थळ निसर्गप्रेमींचे,
सुंदर धरण वाफोलीचे
