STORYMIRROR

vaishali vartak

Others

4  

vaishali vartak

Others

रंगी रंगला श्रीरंग

रंगी रंगला श्रीरंग

1 min
558

पहा गोकुळात कान्हा

खेळ खेळे गोपी संग

आनंदात रंगलेला

रंग खेळण्यात दंग


विसरूनी मी तू पण

पहा कसा झाला दंग

देहभान विसरुनी

*रंगी रंगला श्रीरंग*


मुरलीचा येता सूर

होई राधिका बावरी 

रंगी रंगे मोहनाच्या

वेड लावे तो श्रीहरी


दावी धरा रंगोत्सव

येता पहा हा वसंत 

सृष्टी पहा बहुरंगी

रंग खेळूया हसत 


भेदभाव सारु दूर

जैसा खेळे तो श्रीरंग

 समतेचा भाव दिसे

आनंदात होऊ दंग


पहा मूर्तीमंत प्रेम

असे भक्तीचे प्रतीक

*रंगी रंगला श्रीरंग*

प्रेम तयांचे सात्विक 


साहित्याला गुण द्या
लॉग इन