रंगांची उधळण
रंगांची उधळण
1 min
370
सप्तरंगी रंगात न्हाला,
मानव हा रंगीबेरंगी
चालतो हा पुढेपुढे,
टाकून मागे दुनिया बहुरंगी
उधळण रंगांची करत जातो,
आसमंत दरवळून टाकतो
जरी जमली ही रंगसंगती,
प्रेमरुपी हृदय जिंकून जातो
हृदय असे हे लक्षवेधी,
जिंकून जाते मानवाला
यावरच अवलंबून आहे ,
गाडून टाकायचे दानवाला
स्वतःबरोबर दुसऱ्याचेही,
जीवन रंगीन बनवायचंय
जरी आली दुःखे अनेक,
त्यांना आनंदाने पचवायचंय
लक्ष ध्येयावर सतत ठेवून,
आनंदाने आपण पुढेच धावू
स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही,
जीवनात प्रेमज्योत लावू
