राशन कार्ड
राशन कार्ड
सर्व्हिसवाले म्हणून आम्हा
मिळाले पांढरे राशन कार्ड
मोजूनच घ्यायचं आणि खर्चायचं
म्हणून वाटतं सारंच हार्ड.....!!
नाही कसलं कंट्रोल
नाही राशींचे तांदूळ, गहू
कार्डाचे तीन प्रकार
दुकानवाला म्हणतो पाहू.....!!
तीन रंगाचे तीन प्रकार
आमची वाटणी केली
ऑनलाइन करण्या कार्ड
लोकांनी गर्दी केली......!!
बरं झालं देवा
तीनच प्रकार पाडले
वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली
अनेक प्रकार दडले.....!!
कागदोपत्री करण्यापुरतं
आहे आमचं राशन कार्ड
त्याच्याशिवाय नडतं सारं
आणि जीवन होतं हार्ड.......!!
केशरी पांढरा पिवळा
बरं झालं हिरवा नाही काढला
पुढाऱ्यांच्या राजकारणापायी
इथं तर सारा शेतकरी नडला.....!!
कोणाला समजतं दुःख
आणि कोण गाळते आसू
राशनच्या मालासाठी
नेहमी भांडत असते सासू......!!
नको मला राशन कार्ड
नको कसल्या योजना
कष्ट करून जगेन मी
स्वाभिमानी योजना......!!
