राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
1 min
270
राजमाता राष्ट्रमाता
थोर जिजाऊ माऊली
किती गोड तुझ्या आऊ
तुझ्या प्रेमाची सावली.......!!
तुझ्या धाडसाचे धडे
जगी शौर्याची महती
शिकविले शिवबाला
देत तलवार हाती.........!!
स्वराज्याचे स्वप्न मनी
रयतेत हो पेरले
एका एका गणिमांना
शिवबांनी हो हेरले........!!
रामकृष्ण भिमाचिया
गोष्टी सांगे शिवबाला
एक एक गड घेत
मिळविले स्वराज्याला.....!!
तुझ्या चरणी माऊली
टेकविते माझा माथा
सिंदखेड गावी साजे
तुझ्या साजे शौर्यगाथा....!!
