STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

राजकीय पदासाठी

राजकीय पदासाठी

1 min
328

पोरगा धावत पळत

आईकडे गेला 

मी राजकीय पक्षाचा सदस्य झालो म्हणून सांगू लागला

आई हसली नाही रूसली नाही

कसलाच लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही

बापालाही सांगितले

बापाने दुर्लक्ष केले


पोरगा तसाच आजोबाकडे गेला

राजकीय पक्षाचा सदस्य झाल्याचं सांगू लागला

आजोबा गालातल्या गालात हसला

नातवाला जवळ घेवून म्हणाला 

उगाच कशाला फसला?


नेते पुढारी परिस्थितीचा आढावा घेतात

खोटी सहानुभूती दाखवतात

गाडीमागे पळवतात

तू त्यांच्यासाठी राबशील

ते खांद्यावर हात ठेवून

फक्त शाबासकी देतील

त्यांचा मतलब साध्य झाल्यावर

ते तुला टाळत जातील


ती फक्त स्वतःचा विचार करणारी माणसं असतात

कोणाचं भलं करत नसतात

तेव्हा तुझं भलं होणार नाही

त्यांनी दिलेल्या पदाच्या तुकड्यावर 

तुझं पोट भरणार नाही

त्यांना राबणाऱ्या माणसांची गरज असते

गरज संपली की मग त्यांना ओळखही नसते


तू त्यांच्यासाठी घाम गाळशील

तो एसी गाडीत फिरेल

तो गडगंज माया जमवेल

सात पिढ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवेल

पण तुझ्या भुकेचा त्याला विसर पडेल


नेते पुढारी फक्त राबवत असतात

चैनीत जगत असतात

तुझ्या घामाचं मोल 

त्याला कळणार नाही

तुझ्या मेहनतीची झळ

त्याच्या कळजाला भिडणार नाही

अरे आपला वाटणारा नेता उद्या कोणाचाच नसतो

खूप भेटतात त्याला 

मागे-पुढे फिरणारे पण तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो


अरे त्याच्या श्रीमंतीपेक्षा आपली गरीबी मोठी आहे

त्याच्यासाठी पुरणपोळी

आपल्यासाठी रोटी आहे

आपले दोन हात कष्टाचे

लाख मोलाचे असतात

ते देवासारखे पुजायचे असतात

तेव्हा स्वाभिमानाने कष्ट करून 

अभिमानाने जगायचं

त्याच्यापुढे झुकण्यापेक्षा

त्यालाच आपल्या उंबरठ्यावर डोकं टेकायला लावायचं


Rate this content
Log in