STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

4  

SATISH KAMBLE

Others

राग

राग

1 min
788

राग म्हणजे विस्तव नुसता

ज्वालामुखीचा विशाल डोंगर,

ज्याच्या ठायी मुबलक त्याच्या

बुद्धीवरती फिरतो नांगर


दोन घडीच्या रागापायी

जीव जात असे कित्येकांचा,

चित्त शांत झाल्यावर मात्र

सूर निघत असे पश्चातापाचा


रागामध्ये सुनावले तुम्ही

कटू शब्द जर कोणाला,

असंख्य यातना देऊन जातील

त्याच्या दुःखी मनाला


राग अनावर होऊनी तुमच्या

स्वास्थ्याची होते अगणित हानी,

प्रगतिपथावर तुम्हांस नेईल

शांत चित्त आणि सुमधूर वाणी


सुंदर जीवन जगण्यासाठी

त्याग करावा रागाचा,

रागविरहित जीवनात पहा मग

होईल वर्षाव आनंदाचा...


Rate this content
Log in