Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

mahesh gelda

Others

4.0  

mahesh gelda

Others

पूर्णविराम

पूर्णविराम

1 min
352


मी गेल्यावर असे करा. 

मरणाचे 'उत्सव' करू नका

रडू नका, दुखी होऊ नका

माझ्या आठवांचा एक मोती मात्र

तुमच्या मनाच्या शिंपल्यात जपून ठेवा 


मी गेल्यावर असे करा..

माझ्या नावाचे 'तर्पण' करू नका

करायचेच असेल तर अर्पण करा

माझ्या वस्तूंचे गरजवंतांना !


मी गेल्यावर असे करा..

माझ्या नावाने कुठलाही पुरस्कार नको,

माझ्या नावाने कुठलीही स्पर्धा नको

फक्त देवाच्या मंदिरात भक्तांना नेण्यासाठी

माझ्या नावाची एक 'पायरी' मात्र बांधा


मी गेल्यावर असे करा..

जमिनीत एक छानसे बी पेरा

खत म्हणून माझी राख आहेच, पाणी म्हणून

माझ्या दाटलेल्या अश्रुंचे पाट रोपाच्या आळ्यात भरा

मी गेल्यावर असे करा..

नको ते प्रश्नार्थक चिन्ह, नको ते उद्गारवाचक चिन्ह,

नको तो अर्धविराम अन स्वल्पविराम

यांपेक्षा 'पूर्णविरामच' बरा

मी गेल्यावर असेच करा..!


Rate this content
Log in