पुन्हा नभ येईल भरून
पुन्हा नभ येईल भरून
1 min
219
पुन्हा नभ येइल भरून
विजांचा होईल कडकडाट
आसमंत जाईल दुमदुमुन
ऐकू येईल पाण्याचा खळखळाट
ओलावेल सारी धरती
पाखरांचा सुरू होइल किलबिलाट
दाणे गोळा करायला
रानात होईल एकच गलबलाट
पुन्हा सुगीचे दिवस येतील
शेतकरी कामात गुंग होतील
करून मशागत रानं पेरतील
टपोरे मोती शिवारात उगवतील
पुन्हा नव्याने पहाट होइल
शिवारात नवा थाट होइल
लक्ष्मीचे आगमन होऊन
शेतकरी आनंदाने गाणी गाईल
