पुन्हा अत्याचार घडतो तेव्हा
पुन्हा अत्याचार घडतो तेव्हा
पुन्हा पुन्हा अत्याचार घडतो
तेव्हा प्रश्न पडतो
स्त्रीला खरंच मुक्तस्वातंत्र्य आहे का?
पोटतिडकीने लेकी वाचवा लेकी शिकवाच्या
घोषणा देतात
आणि रोज कितीतरी लेकी बळी जातात
कायदा समान आहे
असेही म्हणतात
आणि गुन्हेगाराच्या दयेची शिफारस करतात
कायदा खरंच आंधळा आहे
गीतेची शपथ घेऊनही
कारभार सावळा आहे
कशाला हव्यात
कोर्ट-कचेरीच्या चकरा
नो तक्रार नो एफ आय आर
गुन्हेगार तो गुन्हेगारच
त्यालाही करा जागेवर ठार
कशाला तारीख पे तारीख
आता तर जशास तसे वागले पाहिजे
त्या नराधमांना शुटच केले पाहिजे
खटला चालवून चालवून
ते बिनकामाचे पोसले जातात
एकीला न्याय मिळेपर्यंत
अणखी कितीतरी बळी होतात
सरकार आणि शासन
काहीच करु शकत नाही
करायचं ते दुर्गा नवचंडी होऊनच करायचे
कालीकेच्या अवताराने
हातात तलवार घेऊन
मुंडकेच छाटायचे
