STORYMIRROR

bhagwant savaltot

Others

3  

bhagwant savaltot

Others

पत्नी

पत्नी

1 min
53

पत्नीला अजून म्हणतात अर्धांगिनी

जी असते सुख व दुःख यांची भागिनी,

भल्या भल्या वळेस आपलेच सोडतात साथ 

ती आपल्या समवेत असते बनून आपला आत्मविश्वास,

शक्ती विना शिव आहेत आर्धे

आणि लक्ष्मी विना विष्णु ही आहेत आर्धे,

घर गृहस्ती स्त्री विना योग्य चालू शकत नाही

आणि तिच्या माये पासून कोणी वंचित राहू शकत नाही,

योग्य वेळेस पत्नी बनते अन्नपूर्णा, बहीण आणि मायेची सावली

आदियुगा पासून ही सावली सर्वानाच लाभली,

एखाद्या वेळेस पुरुष नसू शकतो पत्नी व्रता

पण संस्कारी पत्नी असते पती व्रता ,

नर आणि मादा यांचे नाते असते चमत्कारिक

मुला मुलींना शिकवतात ज्ञान अध्यात्मिक आणि सांसारिक,

पती जर कुटुंबाचा कणा असतो 

तर पत्नी त्याचा बांधा असते,

दोघांच्या साथीने सांसारिक गाडी पुढे चालते

पत्नी ती पत्नी असते 

नवऱ्यासाठी देवाशी देखील लढते

  


Rate this content
Log in