STORYMIRROR

Asmita Sawant

Others

3  

Asmita Sawant

Others

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन

1 min
206

मानाने जगत होती आधी

झाडे वेली इथले पशू पाखरे

शानच हरपली ती रानातली

बदलली इथली माणसं सारे


 सिमेंटच्या चौकोनी जाळ्यात

अडकल्या आता पिढ्या सकळा

उजाड केली ज्याने हरीत वसुंधरा

तोच गॅलरीत फुलवतो शोभेचा मळा


स्वार्थासाठी कत्तली केल्या किती

कित्येक वनचरांना निवारा नाही

निसर्गाच्या सान्निध्यात राहून ही

त्यांनाच हक्काचा आसरा नाही


किलबिलणारे पक्षी कुठे गेले

रान मोकळे उजाड डोंगर सारा

सहन करते वेदना वसुंधरा ही

आटून गेलाय तो जिवंत झरा


फिरते उलटे सृष्टीचे ऋतुचक्र असे

भोग मानवा कमाॆची अपुल्या फळे

कधी पुर कधी वादळे तर दुष्काळ 

श्र्वास-मृत्यूचे अंतर आता कळे


मातीत जे रूजविले ते उगवणार

अंतिम सत्य समजून हेच जाणा

पयाॆवरणाशिवाय मानव जिवंत नाही

 त्याचे संवर्धन करणे हेच कर्तव्य माना


Rate this content
Log in