प्रॉमिस
प्रॉमिस
मी प्रॉमिस केलंय
विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजण्याचं...
मी प्रॉमिस केलंय स्वत:ला
जाईल तिथं सिद्ध करण्याचं....
मी प्रॉमिस केले जीवनाला
संकटातून वर येण्याचं.....
मी प्रॉमिस केलंय मनाला
आत्मनिर्भर होण्याचं....
प्रॉमिस केले शाळेला
रंगरंगोटी करण्याचं....
मी प्रॉमिस केले विश्वासाला
विश्वासास पात्र होण्याचं....
मी प्रॉमिस केले असत्याला
सत्याचीच साथ देण्याचं.....
मी प्रॉमिस केलंय मित्रांना
शेवटपर्यंत न विसरण्याचं....
मी प्रॉमिस केले पावलांना
रोज रोज धावण्याचं....
मी प्रॉमिस केलंय कर्तव्याला
चंदनाप्रमाणे झिजवण्याचं....
मी प्रॉमिस केलं शरीराला
काळजी त्याची घेण्याचं...
मी प्रॉमिस केलंय मुलाला
चांगले संस्कार देण्याचं....
मी प्रॉमिस केलंय श्वासांना
शेवटच्या श्वासापर्यंत चालण्याचं....
प्रॉमिस केलंय मरणाला
कधीही आलास तर न घाबरण्याचं....!!
