परिवर्तन नियम सृष्टीचा
परिवर्तन नियम सृष्टीचा
1 min
691
परिवर्तन नियम सृष्टीचा
नका करू वृक्षतोड
बदलतो सदैव ॠतूचक्र
निसर्गाकडे नाही तडजोड....!!
निसर्गाकडे नाही तडजोड
तूच मानवा आता घे काळजी
पाणी आडवा पाणी जिरवा
नका करू निष्काळजी.........!!
नका करू निष्काळजी
प्लास्टिकचा वापर टाळा
ओला,सुका कचरा वेगळा
घाला प्रदूषणाला आळा........!!
घाला प्रदूषणाला आळा
सारेजन निसर्गाला जपूया
निर्सगाचा समतोल राखण्या
सारेजण सज्ज आता होवूया....!!
सारेजण सज्ज आता होवूया
परिवर्तन नियम सृष्टीचा
कराल तैसे भराल सारे
चष्मा बदला स्वच्या दृष्टीचा......!!