प्रित
प्रित
1 min
110
प्रेम केलं नाही केलं गुन्हा
घडे हा का पुन्हा -पुन्हा
आठवणी येती क्षणोक्षणा
छळे रे माझ्या तना मना
प्रित अशी सख्या सजना. ll१ll
हातात हा हात मी दिला
सांगु कशी रे आता तूला
मन माझे,तुझ्यासाठी झुरे
क्षणात होई कसे रे बावरे
प्रित अशी सख्या सजना..ll२ll
अबोल का तु मीच बोले
मनातली गुपीतं सारे खोले
प्रीतीत तूझ्या रंगुन रे गेले
धुंदित येऊन सुरास आहे छेडले
प्रित अशी सख्या सजना ll३ll
