प्रेमाचा रंग
प्रेमाचा रंग
तुला ज्या ठिकाणी जायचे
तेथे तू खुशाल जा
मी तुला विचारणार नाही
पण तुला माहीत नाही मी कुठे चाललोय
ज्या ठिकाणाहून तुला जायचे आहे
तेथे पोहचल्यावर
तू जाण्याधी तुझ्या पर्समधे
मी ठेवलेली चिठ्ठी वाच
मगच तुला ज्या ठिकाणी जायचे आहे
तेथे जाण्याचा निर्णय घे
मला माहीत आहे
तू धावत येशील
जेथे आपण रोज भेटायचो
पण मी तेथे नसेल
तू शोधशिल तरी
मी तुला सापडणार नाही
तुला बघावस वाटलं
तर बघ वर आभाळाकडे
मी तिथेच असेल
कदाचीत तू नसेल केला विचार
पण मला माहीत होतं
आपण कधीच एक होणार नाही
तरीही आपण एकमेकात गुंतलो
उगाच तुझ्या माझ्या प्रेमाला
जातीचा रंग नको म्हणून मी
या जगातुन जाण्याचा
निर्णय घेतला
पण तू येवू नकोस
तिथेच थांब
प्रेमाची जात काय आहे
कोणाला माहित असल्यास विचार
आणि नसेल प्रेमाला जात
तर तुझ्या माझ्या प्रेमाच्या आठवणीतच तुला जगायच आहे
