प्रेम
प्रेम
1 min
208
प्रेम देशावर
प्रेम जगावर
प्रेम आईवर
असू द्यावे...... !!
प्रेमाचा सागर
मायेची घागर
सुखाची चादर
आई असे.......!!
प्रेम द्यावे घ्यावे
प्रेमाने राहावे
प्रेमसुख द्यावे
सर्वाचिया.......!!
प्रेमाची सरिता
आईच्या करिता
कुशीत ग येता
आई तुझ्या........!!
ममता अपार
तुपाची ग धार
जीवनाचे सार
आई माझी........!!
