STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

प्रेम

प्रेम

1 min
349

प्रेम कर भिल्लासारखं

जिवापाड जपणारं

प्रेम कर शबरीसारखं

गोड बोरे चाखणारं......!!


प्रेम कर सुदाम्यासारखं

मित्राला जीव लावणारं

प्रेम कर श्रीकृष्णासारखं

झोळीतले पोहे मागणारं....!!


प्रेम कर अर्जुनासारखं

सत्यासाठी भांडणारं

प्रेम कर श्रीकृष्णासारखं

सत्यासाठी धावणारं......!!


प्रेम कर रामासारखं

आईचं वचन पाळणारं

प्रेम कर लक्ष्मणासारखं

भावाला जीव लावणारं.....!!


प्रेम कर राधेसारखं

श्रीकृष्णावर भाळणारं

प्रेम कर मी रे सारखं

प्रेमासाठी वचन पाळणारं.....!!


प्रेम कर शिवरायांसारखं

स्वराज्यावर मरणारं

प्रेम कर जिजाऊसारखं

स्वराज्याच स्वप्न पाहणारं....!!


प्रेम कर शंभूसारखं

धर्मरक्षणार्थ मरणारं

प्रेम कर शाहूसारखं

जाज्वल्य इतिहास मांडणारं....!!


प्रेम कर बाबासाहेबांसारखं

विषमतेवर प्रहार करणारं

प्रेम कर सावित्रीसारखं

स्त्रीमुक्तीसाठी लढणाऱं.....!!


प्रेम कर भगतसिंग सुखदेव 

राजगुरूसारखं देशासाठी मरणारं

प्रेम कर ज्योतिबासारखं

स्त्रीमुक्तीसाठी लढणारं......!!


प्रेम कर शहीदांसारखं

बलिदान ते ठरणारं

माय भूच्या सेवेसाठी

प्राण पणाला लावणारं.....!!


Rate this content
Log in