प्रेम
प्रेम
प्रेम कोणावर करावं?
प्रेम कोणावर ही करावं....
आईच्या वात्सल्यावर....
बापाच्या करारी बाण्यावर...
बहिणीच्या अपार मायेवर
भावाच्या मजबूत हौसल्यावर...
शाळेतल्या गुरूवर.....
गल्लीतल्या शेजाऱ्यावर...
गोठ्यातल्या गाईवर....
दुधाच्या साई वर....
म्हशीच्या रेडकावर....
कुत्र्याच्या पिल्लांवर
पक्ष्यांच्या पिल्यावर....
शेळीच्या कोकरुवर
गावातल्या लेकरावर....
बांधाच्या पाटावर.....
गवताच्या पातीवर....
तलवारीच्या पातीवर
महाराष्ट्रातल्या मातीवर...
आजीच्या लुगड्यावर
घरातल्या गोधडीवर....
आंब्याच्या झाडावर...
गुलाबाच्या कळीवर....
आईच्या धपाट्यावर
आत्याच्या रपाट्यावर....
जाईजुई व मोगऱ्यावर
अंगणातल्या कडी पत्त्यावर
चाळीतल्या कट्यावर...
भेळपुरीच्या गाड्यावर....
वर्गातल्या शिक्षकावर
वर्गातल्या बाकावर....
इतिहासाच्या पानापानावर...
प्रत्येक लढाईच्या शौर्यावर
विज्ञानाच्या शोधावर
अंधश्रद्धेच्या प्रहारावर...
प्रेम कोणावर करावे ?
प्रेम कोणावर ही करावं...
आणि ते सदैव करावं...
