Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय

1 min
162


प्रेम म्हणजे काय 

प्रेमाला तरी कळत का

नजरेने नजरेकडे पाहिल्यावर

मन मनाकडे खरचं वळतं का


पुर्वीसारखे प्रेम आता 

कोणीच करत नाही 

काळजामधे घर करून

कायम कोणीच रहात नाही


ती मिळतं नाही म्हणून

तिला जाळली जाते 

मारली जाते

प्रेमाच्या भुलभुलैय्येत फसवून

कुठेतरी ती पुरली जाते


प्रेमाच्या नावाने नुसताच

छळ होत असतो

वासनेशिवास हेतू मात्र

दुसरा काहीचं नसतो


प्रेमाच्या जाळ्यात अडकवून

प्रेमाचीच हत्या होत असते

प्रेमात त्याग करण्याइतके

बळकट काळीज कोणाचेच नसते 


एकमेकांना फुल देण्याला

खर प्रेम म्हणत नाही

खऱ्या प्रेमाचा ओलावा

खरतर कोणालाही कळत नाही


व्हेलेंटाईनडेला म्हणे

कितजण

प्रेम दिवस साजरा करतात

अविश्वासाच्या ज्योतीने स्वतःच

काळीज जाळून घेतात


प्रेम म्हणजे नुसते 

आकर्षण नसते

प्रेम म्हणजे विश्वासाच्या

परडीतले

फुलणारे सुंदर फुल असते


पण या मोबाईल युगात

खऱ्या प्रेमाचा रंगच उडाला आहे

प्रेमाचा रंग कसा

आता प्रेमालाच प्रश्न पडला आहे.


Rate this content
Log in