प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे नेमके काय असतं
कासवाला आयुष्याचं असतं
इंद्रधनुष्या ला सात रंगाचं असतं
प्रेम म्हणजे काय असतं
आईला मुलावर असतं
बहिणीला भावावर असतं
आजोबांना नातुवर असतं
मामाच भाच्यांवर असतं.
प्रेम म्हणजे काय असतं
हसण्याला रडण्याशी असतं
सुखाला दुखाशी असतं
काळोख्याला उजेडाशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं
ह्रुदयात साठवून ठेवायच असतं
वेळ आल्यावर व्यक्त करायचं असतं
कितीही दुःख झालं तरी हसून जगायचं असतं.
प्रेम म्हणजे काय असतं
गैरसमज दूर करायचं असतं
एखाद्याला समजून घ्यायचं असतं.
नेहमी माफ करायचं असतं.
प्रेम म्हणजे काय असतं
भावनेशी खेळायच नसतं
वाईट वागायचं नसतं
कोणाला कमी समजायचं नसतं
प्रेम म्हणजे काय असतं
तीच आणि आपलं असतं
आपलं आणि तीच असतं.
