कन्यादान
कन्यादान
1 min
290
कन्यादान म्हणजे काय
आपल्या पोटाचा गोळा दुसऱ्याला देणे
दोन घरांना एकत्र आणणे
सगळ्यांना समजून घेणे.
कन्यादान म्हणजे काय
आई बाबांच्या मनाला हळ हळ लागणे
मुलगी सुखी असणे
डोळ्यात अश्रू येऊन आठवण येणे.
कन्यादान म्हणजे काय
तिची नेहमी घरात कमी भासणे
प्रत्येक जागेवर तिचा आभास होणे
कधी कधी ती नसतांना ती असल्याची जाणीव होणे.
कन्यादान म्हणजे काय
जुन्या आठवणींमध्ये ती असणे
पण ती नसताना आठवणींमध्ये काहीच जीव नसणे
तिचे मनात घर करून राहणे.
कन्यादान म्हणजे काय
ज्या हातांनी कन्यादान होणे
त्यांची झोळी खाली होणे
ती झोळी नंतर कधीच न भरणे
कितीही सोने दिले तरी.
