STORYMIRROR

Aniket Kotkar

Others

4  

Aniket Kotkar

Others

भय

भय

1 min
434


अंधार नाही पण उजेडातला काळोख म्हणजे भय.

उंच नाही पण उंचावरचा एकटेपणा म्हणजे भय.

दुरावे नाही पण जवळ असताना ची शांतता म्हणजे भय.

एखाद्याचे असणे नाही तर असताना ही आपले नसणे म्हणजे भय आहे.

एकाच घरात राहूनही एकमेकांना न दिसणे म्हणजेच भय.

आयुष्यभर सोबत असूनही जवळ कधी न राहणे म्हणजेच भय.

सवंगडी असतांनाही संवाद नसणे म्हणजे भय.

घोळक्यात असणारा माणूस अचानक एकटा पडणे म्हणजे भय.

रंगभूमी समोरील नाही पण तिच्या मागची शांतता म्हणजे भय.

पाण्या वरती नाही तर पाण्याखाली राहणे म्हणजे भय.

कुटुंब सोडूनही देशासाठी जिवाची झुंज देणे म्हणजे भय.


Rate this content
Log in