STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

प्रेम काय असतं?

प्रेम काय असतं?

1 min
115

प्रेम म्हणजे काय असतं, सांगणे कठीण असतं

ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच कळत असतं  

प्रेम प्रत्येकाचे वेगळ्या भावना व्यक्त करते    

प्रेम हे निव्वळ प्रेम असतं कधीच स्वार्थी नसतं...


आई बाळाचे प्रेम हे माया ममता वात्सल्याचे

याची तुलना जगी कुणाशी होऊ शकते?

गुरु-शिष्याचे प्रेम आदरयुक्त आणि ज्ञानार्जनाचं

आई-वडिलांचे प्रेम संस्कार बिंबवण्याचे असते...


पशु-पक्षी, वृक्ष-वेली वनचरे साऱ्या निसर्गावर

प्रेम हे एक पर्यावरण व निसर्ग संरक्षणार्थी

तसेच सैनिकांचे आपल्या देशावरचे प्रेम निव्वळ

निःस्वार्थी जननी जन्म भुमीच्या रक्षणार्थी...


माणसा माणसातलं प्रेम नात्या गोत्यांचे प्रेम

आपुलकीचे सर्वांना एकजुटीनी सांभाळण्याचे

दीन-दलित पिडीतांसाठी प्रेम एक माणुसकी 

धर्म आणि निःस्वार्थी दया कृपा जोपासण्याचे...


प्रेम, प्रेम असतं तुमचं आमचं समान असतं

असं मुळीच मानायचं व समजायचं नसतं

प्रेम, प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं

प्रसंग व परिस्थितीवर ते अवलंबून असतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन