प्रेम आईचे अपार...
प्रेम आईचे अपार...
1 min
274
प्रेम आईचे अपार
जीव लाविते लेकरा
येते धावत पळत
जणू भेटते वासरा......
प्रेम आईचे असते
जणू निरझर झरा
घेता मांडीवर बाळं
मिळतो आनंद खरा.....
प्रेम आईचे असते
आभाळा एवढे मोठे
तिच्या पुढे पडतात
सर्व नाते रे छोटे........
प्रेम आईचे प्रेमळ
जणू वाहते सरिता
किती राबे पिलासाठी
कष्ट करी मुलांकरिता.....
आईचे हृदय असे
जणू वात्सल्याचा झरा
आईच्या कुशीत जाई
निघून शिण रे सारा.....
