पिठोरी अमावस्या
पिठोरी अमावस्या
1 min
13.9K
सण लग्न सोहळ्याचा
सर्जा राजाच्या लग्नाचा
श्रावण महिन्यांचा अंती
पोळा सण हा आंनदाचा
झाली लगबग हळदीची
सर्जा बैलास लावायची
नवरदेव तयार सजून
वर्षभर मेहनत करून
नविन झूल पांघरून
कंठी नवी घंटी लेवून
शिंगास पताका लावून
रंगरंगोटी फुगे बांधून
जरी दमलाय करून
शेता मध्ये आला राबून
माझ्या बाबाच लेकरू
त्याचे लाख कोड कौतूक
वरातीत ढोल ताशा वाजतो
नवरा खुषीत ओ डोलतो
कसा झुकून लाजतो
गाय वासरू दिसता
आंनद सोळहा सारा
साजरा होतो पुरा
मंगकाष्टक गाते आई
लग्नात बैलाच्या बाई
अख्खे वर्षभर राबतो
पण आज त्याचा दिवस
त्याच्या लग्नाचा हा थाट
सण पोळ्याचा अन् आवास
माहेरी पिठोरी अवस
येते ती आठवणी घेऊन
पाणवतात डोळे आज
आठवणी बाबाच्या येऊन

