STORYMIRROR

Surajkumari Goswami

Others

4  

Surajkumari Goswami

Others

हरवल्या गाव परंपरा संकृती

हरवल्या गाव परंपरा संकृती

1 min
408

वेदनेत आज सांज आहे

हरवले माझे गाव आहे.....

माझ्या आठवणीतले गाव 

आज मनात दडले आहे....


 गाव तसे खेड्याचे होते

प्रेमाचेच तीथे वारे होते

गावा होता वडाचा पार

गर्दी तीथे व्हायची फार


लहान सहान क्रार्यक्रमाचे

निश्चीत स्थान तीथे आहे


     हरवली  गाव परंपरा .संकृती ...आहे 

गावकरी तशी साधी भोळी

रामप्रहरी नेहमीची भुपाळी

नटायचे सारे हरएक सणास

पुरणपोळी नेवैद्य असे देवास

खळाळत्या नदीमध्ये पोरांचा

खेळण्याचा परीपाठ आहे.   


गावात त्या होती आर्दश शाळा 

तीथे फुलवला संस्काराचा मळा

दर्ग्यात चाले नमाज पाच काळ

मंदिरातून वाजे मृदंग अन् टाळ

सणासणांचे नुसते ऊधाण आहे

अल्लाह् राम संगतीने तीथे आहे


      वेदनेत आज सांज आहे

एकच किराणा, एकच चांभार

एकच न्हावी; अन् एकच पार

एक विहीर त्याला एकच रहाट

आयाबायांना त्याचाच आधार.


भांडणतंट्याला पंचाचा धाक 

पाटलाचा गावात वचक आहे

पाराचा वड आजही तसाच आहे 

पण माणसं आता जमत नाहीत 


भांडणतंटे सुद्धा तसेच आहेत पण 

पंचांना आता कोणी जुमानत नाहीत 

एकमेकांची सुख दुःख आता नाहीत 

नविन वारे आज तीथे फिरून गेलेत 

म्हणून पारही आताशा खचला आहे

        वेदनेत आज सांज आहे

        हरवल्या  गाव परंपरा सकृती  आहे.



Rate this content
Log in