STORYMIRROR

Surajkumari Goswami

Others

4  

Surajkumari Goswami

Others

माणसात माणुसकी

माणसात माणुसकी

1 min
41K


माणसात माणुसकी; शोधीत मी निघाले 

मैत्रीत कालच्या वैरी; टाळीत मी निघाले.

वाद घातले होते; आपल्याच आप्तजांनी

मध्यस्थीचे हात होते; टाळीत मी निघाले. 

मक्तेदारी दाखवायची; होढ त्यांना होती

गटातटांचे भांडण; टाळीत मी निघाले

मान्य ना कुणाचे वर्चस्व त्यांनी कधी केले

सुर्याचा तेज जाळ टाळीत मी निघाले.

विसरून वैर सारे; गळाभेट मैत्रीची होती

स्वार्थीच सोहळा तो; टाळीत मी निघाले

प्यालावर प्याले मदहोष रिक्त होत होते

बेभान त्या गीतांना; टाळीत मी निघाले

सौख्यास माझ्या होते; हिणवले कैक वेळा

निंदेस त्या जगाच्या; टाळीत मी निघाले

   


Rate this content
Log in